रमेश कदमाला कोर्टाचा दणका, मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

रमेश कदमाला कोर्टाचा दणका, मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

  • Share this:

ramesh_kadam10 मार्च : राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश  मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने दिले आहे.

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणी रमेश कदम सध्या जेलमध्ये आहे. कोर्टाने आज रमेश कदम यांचा दणका देत जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहे.  विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती टंकीवाला यांनी हे आदेश दिलेत.

रमेश कदम यांची एकूण १३५ कोटी १६ लाख ८२ हजार ६०८ रुपयाचा मालमत्ता सीआयडीने जप्त केलीये.  यात शेती, प्लॉटस, पेडर रोड येथील प्लाॅट, औरंगाबाद येथील मालमत्ता आणि २०-२५ बॅंक अकाऊंट अशा एकूण ५४ मालमत्ता जप्त रमेश कदम यांच्या जप्त करण्यात आल्या आहेत.

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणी सध्या रमेश कदम अटकेत असून त्यांनी ४०० कोटींपेक्षा जास्तीचा घोटाळा केल्याचं बोललं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 10, 2017, 5:23 PM IST

ताज्या बातम्या