S M L

स्थायी समितीसाठी सेनेकडून अखेरच्या क्षणी कोरगावकरांना उमेदवारी,सातमकरांना डच्चू

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2017 04:41 PM IST

स्थायी समितीसाठी सेनेकडून अखेरच्या क्षणी कोरगावकरांना उमेदवारी,सातमकरांना डच्चू

10 मार्च : मुंबई महापालिका स्थायी समिती निवडणुकीत अखेरच्या क्षणी शिवसेनेकडून रमेश कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर  मंगेश सातमकर यांचे नाव वगळण्यात आलंय.

महापौरपदाच्या निवडीनंतर स्थायी समितीसाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केलीये. स्थायी समितीसाठी सेनेकडून मंगेश सातमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. आज स्थायी समिती निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी अचानक उमेदवार बदलण्यात आला.

मंगेश सातमकर यांना डच्चू देऊन भांडुपच्या वाॅर्ड क्रमांक 114 चे नगरसेवक रमेश कोरगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. भांडुप विधानसभा मतदारसंघातून अशोक पाटील यांना आमदारकी दिल्याने रमेश कोरगावकरांची संधी हुकली होती. महापौरपदासाठी पूर्व उपनगरातून सक्षम उमेदवार म्हणून चर्चा होती. मात्र तिही संधी हुकल्यामुळे अखेरीस त्यांची वर्णी स्थायी समितीसाठी लागलीये.

कोण आहेत रमेश कोरगावकर ?

- वॉर्ड क्रमांक 114चे नगरसेवक (भांडुप)

- नगरसेवकपदी चौथ्यांदा विराजमान

- स्थापत्य समिती अध्यक्ष ( उपनगर ) आणि

- सलग सात वर्ष स्थायी समिती सदस्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2017 04:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close