केवळ कर्जमाफी हा पर्याय नाही - चंद्रकांत पाटील

केवळ कर्जमाफी हा पर्याय नाही - चंद्रकांत पाटील

  • Share this:

chandrakant-patil

10 मार्च : आम्ही शेतकर्यांच्या बाजून मात्र केवळ कर्जमाफी हा पर्याय नसल्याचं  सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, कर्जमाफीव्यतिरिक्त अनेक पर्याय असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

राज्यात सुरू असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधकांनी दोन्ही सभागृहात आजही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून चांगलाच गदारोळ घातला. विरोधकांनी विधानसभेच्या पायाऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं. दुसरीकडे शिवसेनेने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं.

विरोधकांच्या मागणीला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही शेतकर्यांच्या बाजून मात्र केवळ कर्जमाफी हा पर्याय नाही, त्याव्यतिरिक्त अनेक पर्याय आहेत. पाटलांच्या या वक्तव्यावर विरोधकांही एकच गोंधळ घातला आणि विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. त्यात उद्या दुसरा शनिवार, मग रविवार आणि सोमवारी धुळवडची सुट्टी असल्याने आता थेट मंगळवारीच अधिवेशन होणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 10, 2017, 2:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading