S M L
Football World Cup 2018

म्हैसाळ गर्भपात प्रकरणी चार एजंटवर कारवाई

Samruddha Bhambure | Updated On: Mar 10, 2017 11:14 AM IST

म्हैसाळ गर्भपात प्रकरणी चार एजंटवर कारवाई

554656-khidrapure-babasaheb-030817

10 मार्च : म्हैशाळ गर्भपात प्रकरणात गुंतलेल्यांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. याप्रकरणी आज चार एजंटवर कारवाई करण्यात आली आहे. यातील दोन एजंटना अटक केली असून दोघांना ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करून कोल्हापूर जिल्यातील तेरवाड इथून यासीन तहसीलदार याला तर कर्नाटकमधल्या कागवाड इथून सातगोंडा पाटील या दोन एजंटना अटक केली आहे. तर सांगली जिल्ह्यातील शिरढोणमधून संदीप जाधव आणि कागवाडमधून वीरगोंडा गोमटे या दोघांना ताब्यात घेतलं आहे.

तर यातील एजंट संदीप पाटील यानेच जामदाडे पती-पत्नीला डॉ. खिद्रापुरे यांच्याकडे उपचारासाठी आणले असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी काल रात्री उशीरा खिद्रापुरेच्या घरावर टाकलेल्या छाप्यात गर्भपातासाठी वापरण्यात आलेली इंजेक्शन्स आणि गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

याशिवाय काल या प्रकरणात सांगलीतून सुनील खेडकर आणि विजापूरमधून रमेश देवगीकर या दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्या दोघांनाही न्यायालयानं 13 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2017 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close