S M L

मरणानेही छळलं, 'ती'चा मृतदेह 5 दिवस शवागरात होता तरीही...

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2017 12:01 AM IST

मरणानेही छळलं, 'ती'चा मृतदेह 5 दिवस शवागरात होता तरीही...

09 मार्च : धर्म आणि पंथाच्या कचाट्यात अडकलेल्या तृतीयपंथीयाची मृत्यूनंतरही अवहेलना झाल्याची घटना लातूरमध्ये घडलीय. राणी उर्फ अनिल काथवटे या 36 वर्षीय तृतीयपंथीयाचा 4 मार्चच्या रात्री मृत्यू झाला. पण, त्याचा मृतदेह ना त्याच्या घरच्यांनी स्वीकारला ना  तृतीयपंथीनी. अखेर राणीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सामाजिक संस्थेला पुढाकार घ्यावा लागला.

भोई गल्लीत राहणाऱ्या अनिलला लहानपणीच त्याच्यातील उणीवांची जाणीव झाली आणि तो तृतीयपंथीयांच्या गटात सामील झाला. अंबाजोगाईतल्या एका तृतीयपंथ्याला गुरु मानल्यानंतर अनिलने पांरपारिक स्त्रीवेशात वावरणं सुरू केलं. ४ मार्चच्या मध्यरात्री याच परिसरात पोलिसांना त्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर त्याचा मृतदेह 5 दिवस अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत शवागारात पडून होता.

पोलिसांनी राणीच्या नातेवाईकांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो "हिजडा" झाला तेंव्हाच आमच्यासाठी मेला' असे सांगत नातेवाईकांनी त्याच्याकडे पाठ फिरविली. तर तृतीयपंथीयांशी चर्चा केल्यावर हा आमच्या पंथाचा नाही असं म्हणत, त्यांनीही मृतदेह स्विकारायला नकार दिला. अखेरीस 'सेवा आधार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून, पाच दिवसानी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2017 12:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close