जम्मू-काश्मीरमध्ये गोळीबारात साताऱ्याचे दीपक घाडगे शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये गोळीबारात साताऱ्याचे दीपक घाडगे शहीद

  • Share this:

Pulwama Terror Attack209 मार्च : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात साताऱ्याच्या जवानाला वीरमरण आलंय.  दीपक जगन्नाथ घाडगे असं या जवानाचं नाव आहे. ते साताऱ्यातील फत्यापूर गावचे रहिवासी होते.

जम्मू काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यातील पडगमपुरा भागात आज (गुरूवारी) सकाळपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या ठिकाणी 4-5 दहशतवादी घरात लपून बसल्याचा संशय होता. त्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घालून कारवाई केली. या कारवाईत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झालाय.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील फत्यापूर गावचे सुपुत्र दीपक जगन्नाश घाडगे यांना वीरमरण आल्यामुळे गावावर शोककळा पसरलीये. दीपक यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. शहीद दीपक यांचे पार्थिव उद्या संध्याका पर्यंत साताऱ्यात पोहचणार आहे. दिपक घाडगे यांच्यावर फत्यापूर गावात शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2017 09:25 PM IST

ताज्या बातम्या