हा शेवटचा पराभव,आता यानंतर पराभव नाही पाहायचा -राज ठाकरे

हा शेवटचा पराभव,आता यानंतर पराभव नाही पाहायचा -राज ठाकरे

  • Share this:

raj_thackery

09 मार्च : लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि आता महापालिका निवडणूक झाली. आतापर्यंत पाहिलेला हा शेवटचा पराभव आहे यानंतर पराभव नाही पाहायचा असं सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्याने कामाला लागा असा आदेशच कार्यकर्त्याना दिला. तसंच आता जे जिंकलेत त्यांचे फासे मी घेणार आणि त्यांचे डाव मी खेळणार असा निर्धारही राज ठाकरे यांनी बोलून दाखवला.

महापालिका निवडणुकीत दारूण पराभवानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ष्णमुखानंद हाॅलमध्ये 11 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाषणाला सुरूवात करताना वाढलेल्या दाढीवर राज ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी केली. दाढी करताना ब्लेड लागल्यामुळे दाढी वाढवली. आता दाढीला आकार उकार यावा म्हणून फ्रेंच कट ठेवली असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर हे माझं सगळ्यात छोटं भाषण आहे असं जाहीर करत ज्या प्रकारचे निकाल आले त्याबद्दल अपेक्षा नव्हती. ईव्हीएम मशीन बदल जे काही ऐकू आलं ते खरं असेल तर फार भंयकर आहे. निकाल लागला तेव्हा मनात एकच प्रश्न आला पैसा जिंकला आणि काम हरलं अशी खंत राज ठाकरेंनी बोलून दाखवली.

'निवडणूक लढवण्याचं शिकलो'

काम करून, काम दाखवून निवडणूक जिंकता येत नाही हे या निवडणुकीवरून सिद्ध झालं. या निवडणुकीत मतदाराने कशी निवडणूक लढवायची हे शिकवलं. वाद आणि शिव्या याला हुरळून जाऊन निवडणूक जिंकता येते. कामांचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही असं वाटतं. ज्या पक्षाकडे उमेदवार नाही असे उमेदवार निवडून आले. त्यामुळे ही निवडणूक कशी लढायची हे मी शिकलोय असंही राज ठाकरे म्हणाले.

परिचारकांना चप्पलाने फोडून काढलं पाहिजे

भाजपचे पुरस्कृत आमदार सुधाकर परिचारक जवानावर अभ्रद्र बोलतोय. अशा माणसांना भर चौका-चौकात चप्पलाने फोडलं पाहिजे अशी जळजळीत टीका राज ठाकरेंनी केली.

हा शेवटचा पराभव

फासे टाकण्याचा एक खेळ आहे.  त्या खेळाप्रमाणे जे जिंकलेत त्यांचे फासे मी घेणार हे तुमचा उत्साह वाढवण्यासाठी सांगत नाहीये. त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी मी करणार. लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि आता महापालिका झाली. हा पाहिलेला पराभव तुमचा शेवटचा पराभव होता. यांच्यानंतर आता पराभव नाही नाही पाहायचा. येणाऱ्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश देत कार्यकर्त्यांना उत्साहही वाढवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 9, 2017, 8:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading