महापालिका,जि.परिषदेतल्या पराभवाची जबाबदारी माझी-अजित पवार

महापालिका,जि.परिषदेतल्या पराभवाची जबाबदारी माझी-अजित पवार

  • Share this:

ajit_pawar_pune3309 मार्च : 10 महापालिका आणि 21 जिल्हा परिषदांमध्ये  झालेल्या पराभवाची जबाबदारी माझी असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अखेर मौन सोडले.

'महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे याबाबत मौन बाळगून होते. मात्र या पराभवाची संपूर्ण जबाबदारी माझी असल्याचं सांगत त्यांनी आपलं मौन सोडलंय. पराभवाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्विकारली असून त्यातून धडा घेत पक्षाची पुढील वाटचाल करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याचे अधिकार अध्यक्ष शरद पवार यांना आहे असंही पवारांनी सांगितलं.

महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीत राष्ट्रवादीचं पानिपत झालं. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीचा पराभव झाला. निकालानंतर अजित पवार नाॅटरिचेबल झाले होते अखेर आज अजित पवारांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 9, 2017, 5:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading