कर्जमाफीसाठी विरोधकांसह भाजप-सेनेच्या आमदारांचीही घोषणाबाजी

कर्जमाफीसाठी विरोधकांसह भाजप-सेनेच्या आमदारांचीही घोषणाबाजी

  • Share this:

asdadaopy

09 मार्च :  एरव्ही विरोधी पक्षाचे आमदार सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसतात, मात्र आज (बुधवारी) सत्तेतील शिवसेना आणि भाजपचे आमदार घोषणाबाजी करतानाचं अजब चित्र विधीमंडळाच्या आवारात पाहायला मिळालं.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन कामकाजाला सुरूवात होताच विरोधकांनी विधानसभेत गदरोळ झाला. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, अशा घोषणा शिवसेना आमदारांनी केल्या.

आधी शिवसेना आमदारांनी घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडलं. त्यानंतर भजाप आमदारांनीही आक्रमक पवित्रा घेत, शेतकरी कर्जमाफीसाठीच  त्यांनीही घोषणाबाजी सुरु केली.

त्यामुळे सध्या सत्ताधारी भाजपमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्री एका बाजूला, आणि आमदार एका बाजूला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, विरोधकांनी याहून टोकाची भूमिका घेत कर्जमाफीची घोषणा करेपर्यंत सभागृह चालूच देणार नाही, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 9, 2017, 2:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading