मनसेच्या 11व्या वर्धापन दिनी राज ठाकरे मांडणार भूमिका

मनसेच्या 11व्या वर्धापन दिनी राज ठाकरे मांडणार भूमिका

  • Share this:

 

Raj-Thakre09 मार्च : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 11 वा वर्धापनदिन आहे. विधानसभा निवडणुका आणि आता झालेल्या महपालिका निवडणुकांमध्ये मनसेचा साफ पराभव झालाय.पण पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा उभे राहण्याचीच भूमिका राज ठाकरे मांडणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

दहा महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मनसेचा ११वा वर्धापन दिन माटुंगाच्या षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात येणार आहे. मराठी पाट्यांपासून टोलमुक्त महाराष्ट्रापर्यंत अनेक आंदोलनं करत मनसे राज्यभर पसरला. गेल्या निवडणुकीत त्यांनी नाशिक महापालिकेत सत्ताही मिळवली. गेल्या विधानसभेत १३ आमदार निवडूनही आले होते. पण आता पक्षबांधणीअभावी मनसेची पडझड होऊ लागली.

या साऱ्याचा राज यांनी गेल्या काही दिवसात आढावा घेतला असून राज्यभर नव्याने पक्षबांधणीपासून वेगवेगळी आंदोलनं हाती घेण्याचा निर्णय राज यांनी घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. आगामी काळात होणाऱ्या महाविद्यालयीन निवडणुका लक्षात घेऊन मनसेच्या विद्यार्थी सेनेचीही नव्याने रचना करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2017 12:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...