S M L

रामू विरुद्ध आव्हाड ट्विटर युद्ध पेटलं

Sonali Deshpande | Updated On: Mar 9, 2017 12:06 PM IST

रामू विरुद्ध आव्हाड ट्विटर युद्ध पेटलं

09 मार्च : सोशल मीडियावर वाद होणं आता काही नवीन नाही.असंच एक ट्विटर युद्ध सध्या राम गोपाल वर्मा आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये रंगलंय.

काल महिला दिनानिमित्त सनी लिओनचा उल्लेख करून आक्षेपार्ह ट्विट केलं, असा आव्हाडांचा आरोप आहे. त्यांनी रामूला त्याच्या ऑफिसमध्ये येऊन धडा शिकवण्यची धमकीही दिलीय, तर रामूनं त्याच्या ऑफिसचा पत्ता ट्विटरवर दिला आणि आव्हाडांना जोकर असं म्हटलं. शरद पवारांनी आव्हाडांना पक्षातून हाकलून द्यावं, असंही रामूनं ट्विट केलंय.

पाहूयात हे संभाषण नक्की कसं पुढे गेलं ते

रामू x आव्हाड ट्विटर युद्ध

रामू - एका पुरुषाला सनी लिओन जेवढा आनंद देते, तेवढा आनंद प्रत्येक महिलेनं द्यावा, अशी माझी इच्छा आहे.

आव्हाड - माफी माग किंवा परिणामांना सामोरं जा. कायदा हातात घ्यायला आमची काहीच हरकत नाही. तुझा पत्ता दे आणि मग बघ. तुला आई नाहीय का?

रामू - कायदा हातात घेण्याची भाषा केल्यामुळे महान शरद पवारांनी तुला पक्षातून हाकललं पाहिजे. त्यांच्या आदर्शांवर तू बट्टा आहेस. तू माफी नाही मागितलीस तर मी तुझ्याविरोधात रीतसर तक्रार करीन.

आव्हाड- जा, खुशाल तक्रार कर

रामू - तुला कायदा हातात घ्यायचाच असेल, तर मी माझ्या वीरा देसाई रोडवरच्या कार्यालयात उपलब्ध असेन. आव्हाडांच्या प्रोफाईलवर लिहिलंय की चूक असो वा बरोबर, मला जे वाटतं ते मी व्यक्त करतो. आणि या विदूषकाला इतरांनी व्यक्त होण्यावर आक्षेप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2017 10:43 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close