राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या हातातलं बाहुलं,अशोक विखे पाटलांचं आरोपास्त्र

राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या हातातलं बाहुलं,अशोक विखे पाटलांचं आरोपास्त्र

  • Share this:

asohk_patil09 मार्च : विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कुंटुबातील वाद चव्हाट्यावर आलेत. राधाकृष्ण विखे हे भाजपच्या हातातलं बाहुल असल्याचा आरोप त्यांचे मोठे बंधू अशोक विखे यांनी केलाय.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेकायदेशीरपणे प्रवरा ग्रामीण एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्षपद स्वत:कडे घेतले आहे असा आरोपही त्यांनी केलाय. पुण्यात पत्रकार परिषद घेवून त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात आरोपांची राळ उठललीय.

बाळासाहेब विखे पाटील यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्था स्वत:च्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न राधाकृष्ण विखे पाटील करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दरम्यान, स्वतः राधाकृष्ण विखेंनी मात्र, हा घरगुती वाद असल्याचं सांगत सध्यातरी जाहीरपणे प्रतिक्रिया देणं टाळलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 9, 2017, 12:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading