ज्ञात-अज्ञात पक्षांचे आभार,उद्धव ठाकरेंनी टाळला भाजपचा उल्लेख

ज्ञात-अज्ञात पक्षांचे आभार,उद्धव ठाकरेंनी टाळला भाजपचा उल्लेख

  • Share this:

uddhav_on_bmc408 मार्च : विजय हा महत्वाचा असतो. कोण काय घोषणा द्यावत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला त्यावेळी शिवाजी महाराज की जय या घोषणा अपेक्षीत होत्या. पण त्या निमित्ताने प्रत्येकाची मन उघड झाली अशी नाराजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली. तसंच ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या ज्ञात आणि अज्ञात पक्षांचे आभार मानतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपचा उल्लेख टाळला.

उद्धव ठाकरे यांनी आज महापौर आणि उमहापौर निवडणुकीसाठी पालिकेत आले होते. भाजप नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या समक्षच मोदींचा जयघोष करायला सुरूवात केली. त्यामुळे काही काळ महापौर शिवसेनेचा पण आवाज मात्र भाजप नगरसेवकांचा असं चित्र पालिका सभागृहात निर्माण झालं होतं. या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे यांनी पालिकेबाहेर येऊन त्यांनी मुंबईकरांचे आभार मानले. त्यानंतर ते मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या नव्या शिलेदारांसह हुतात्मा चौकात जाऊन हुतात्मा स्मारकाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार मंत्री आणि नगरसेवक हजर होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेनेला कौल दिल्याबद्दल मुंबईकरांचे आभार मानले.

मला खरंच आनंद आहे. तमाम मुंबईकरांची इच्छा होती सलग पाचव्यांदा महापौरपदाची जबाबादारी शिवसेनेवर सोपवली. खूप मोठं असं हे शिवधनुष्य आहे. कोणत्याही पक्षावर सातत्याने हा विश्वास दाखवला आहे. माझ्याकडे त्यांचे ऋण फेडण्यासाठी शब्द नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.  जनतेचा रेटा फार महत्वाचा असतो. ठाण्यात एकहाती सत्ता मिळालीये. मुंबईत काही जागा कमी मिळाल्या आहे. पण मुंबईकर ती भरपाई केल्याशिवाय राहणार नाही.परंतु ज्याने ज्याने विजयासाठी मदत केली आहे. ज्ञात आणि अज्ञात राजकीय शक्ती आणि राजकीय पक्षांचे आभार मानतो असं म्हणत त्यांनी भाजपचं नाव न घेता आभारही मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 9, 2017, 12:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading