संसाराशी 'दोन हात' करणाऱ्या रणरागिणीच्या जिद्दीची कहाणी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 8, 2017 10:30 PM IST

संसाराशी 'दोन हात' करणाऱ्या रणरागिणीच्या जिद्दीची कहाणी

प्रशांत बाग, नाशिक

08 मार्च : आज जागतीक महिला दिनाचा जागर सर्वत्र होतोय. आपल्या स्वयं कर्तृत्वानं वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मानही केला जातोय. पण समाजात आजही अश्या काही महिला आहे ज्या प्रकाशात नसल्या तरी आपल्या जिद्दीच्या बळावर त्यांनी आपलंच नव्हे तर अवघ्या कुटुंबाचं आयुष्य घडवलंय.

gavaliया आहेत शहरातील अश्विनी कॉलनीत राहणाऱ्या सुनीता गवळी. जन्मापासून दोन्ही हात नसल्यानं त्या हताश झाल्या नाहीत तर जगण्याच्या उमेदीनं त्यांनी आपलं आयुष्य घडवलंय.

दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर काय नाही होऊ शकत याचं त्या मूर्तीमंद उदाहरण म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. सुनीता गवळी यांच्या घरात पतीसह 2 मुले राहतात. पायाचा वापर करून त्या घरातील सर्व कामं करतात.

स्वयंपाक असो की मुलांचा अभ्यास,हिम्मत आणी चिकाटीनं आयुष्य आनंदाने जगणाऱ्या सुनीता गवळी या प्रकाशात नसल्या तरी स्वतःचं आयुष्य त्या ताठ मानेनं जगतात.सलाम त्यांच्या जिद्दीला...

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2017 10:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...