सात किलोमीटर पायी प्रवास करणारी 'पोस्टवुमन' !

सात किलोमीटर पायी प्रवास करणारी 'पोस्टवुमन' !

  • Share this:

कपिल भास्कर, नाशिक

08 मार्च : जिद्द असली की माणूस काहीही करू शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण नाशिकमध्ये बघायला मिळतंय. शहरापासून जवळच असलेल्या बेलतगव्हाण या गावात गेल्या 13 वर्षांपासून रोज 7 किलोमीटर पायी प्रवास करत शर्मिला पाळंदे नागरिकांना पोस्टाची सेवा देतायत.

nashik_pkgया आहेत शर्मिला पाळंदे, शिक्षण एमएस्सी...कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असल्यानं पोस्टवुमनच्या नोकरीचा प्रस्ताव आला आणि शर्मिलांनी मागचा-पुढचा विचार न करता ती नोकरी स्वीकारली. पोस्टाची सेवा देतादेता शासनाच्या अनेक योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळेच त्यांच्या या बेलतगव्हाणच्या छोट्याशा कार्यालयात दिवसभर लोकांची गर्दी असते.

बँक व्यवहार आणि गुंतवणुकीबाबत त्यांनी महिलांमध्ये विश्वास निर्माण केला. गेल्या सहा महिन्यात त्यांनी गावातल्या 1200 लोकांची खाती बँकेत उघडून दिली. सरकारच्या सुकन्या योजनेचा अनेकांना फायदाही करून दिला.

पोस्ट खात्याकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनापेक्षा वंचितांसाठी केलेल्या कामाचं मोठं समाधान शर्मिला सांगतात. अशा होतकरू महिलेला आयबीएन लोकमतचा सलाम.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 8, 2017, 10:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading