मुंबई पालिकेत उद्धव ठाकरेंसमोर भाजप नगरसेवकांची 'मोदी मोदी' घोषणाबाजी

मुंबई पालिकेत उद्धव ठाकरेंसमोर भाजप नगरसेवकांची 'मोदी मोदी' घोषणाबाजी

  • Share this:

uddhav_vs_bjp08 मार्च : मुंबई महापालिकेवर अखेर भगवा फडकला. महापौरपदी सेनेचे विश्वनाथ महाडेश्वर विराजमान झाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पालिकेत पोहचले तेव्हा भाजपच्या नगरसेवकांनी मोदी मोदी घोषणाबाजी करून एकच गोंधळ घातला. तर सेनेच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करून पलटवार केला.

मुंबई महापालिकेत आज महापौरपदाची निवड प्रक्रिया पार पडली. भाजपने सेनेच्या बाजूने मतदान केलं. शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांना 171 मत पडली. मात्र, दुसरीकडे शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये यावेळी जोरदार घोषणायुद्ध रंगलं.

महापौरपदाची निवडणूक पार पडल्यानंतर नेहमी प्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबई पालिकेत पोहचले. विश्वनाथ महाडेश्वरांचं अभिनंदन करण्यासाठी व्यासपीठावर पोहोचले असता भाजपच्या नगरसेवकांनी मोदी मोदीच्या घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडलं. उद्धव ठाकरे यांच्यासमोरच भाजप नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनीही बाळासाहेबांच्या नावाने घोषणाबाजी केलीय. एकीकडे शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपने मतदान केलं. पण, दुसरीकडे घोषणाबाजी करून आपला महापौर न होण्याची खंत भाजपच्या नगरसेवकांची दिसून आली. भाजप आणि सेनेतील हा संघर्ष असाच सुरू राहिल हे यावरुन स्पष्ट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2017 07:40 PM IST

ताज्या बातम्या