महिला दिनी सावित्रीच्या लेकींनी केला शिवरायांचा गड स्वच्छ

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 8, 2017 09:04 PM IST

महिला दिनी सावित्रीच्या लेकींनी केला शिवरायांचा गड स्वच्छ

[wzslider]

08 मार्च : फक्त फोटो काढून आणि शुभेच्छा देऊन महिला दिन साजरा न करता कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांनी पारगड या शिवकालीन गडाची स्वच्छता केली. इथल्या तरुणांकडून गडावर होत असलेली  अस्वच्छता याला आळा बसावा म्हणून महिलांनी गडाची स्वच्छता  करुन एक वेगळा आदर्श दाखवलाय.

पारगड हा शिवाजी महाराजांनी गोव्यातील पोर्तुगीजावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला किल्ला. आता या किल्यावर तरूणाई दारू पिण्यासाठी येत आहे. ही खेदाची बाब आहे. त्यासाठी इथल्या महिलांनी एकत्र येऊन घोषणा देत हा महिला दिन साजरा केला. यावेळी महिलांनी किल्ल्याची स्वच्छता तर केलीच सोबत झाडाझुडपात पडलेल्या दारूच्या बाटल्या गोळा करून त्याची होळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2017 06:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...