'मोदी मोदी' आणि 'बाळासाहेबां'च्या घोषणांनी मुंबई पालिका दणाणली

'मोदी मोदी' आणि 'बाळासाहेबां'च्या घोषणांनी मुंबई पालिका दणाणली

  • Share this:

mumbai_palika_seva_Vs_bjp08 मार्च : शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर महापौर होणार हे निश्चित होतं. त्यामुळे महापालिकेत आज महापौर निवडीची औपचारिक प्रथा पार पडली. पण, हे घडत असताना भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलं घोषणायुद्ध रंगलं. भाजपच्या नगरसेवकांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या तर सेनेच्या नगरसेवकांनी 'आवाज कुणाचा...'आणि बाळासाहेबांच्या नावाने घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडलं.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले. प्रचारात एकमेकांवर येथेच्छ चिखलफेक केली. निकालाअंती मतदाराजाने मात्र, कुणाच्या हाती सत्ता न देऊन दोघांच्या तंगड्या एकमेकांत गुंतवल्या. मग महापौरपदासाठी पुन्हा एकदा सेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू झाली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन सेनेचा मार्ग मोकळा करून दिला. पालिका तुम्ही सांभाळा राज्य आम्ही सांभाळू असा संदेशच मुख्यमंत्र्यांनी दिली. भाजपच्या माघारीमुळे सेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौरपदाच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांची निवड निश्चित मानली गेली.

mumbai_sena_bjp (5)आज ठरल्याप्रमाणे महापौरपदाच्या निवडीसाठी सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात हजेरी लावली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा आणि एमएमआयएमचे नगरसेवक सभागृहात दाखल झाले. त्यानंतर भाजपचे नगरसेवक जेव्हा सभागृहात आले तेव्हा सर्वांनी मोदी मोदींच्या घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडलं. भाजपच्या नगरसेवकांची घोषणाबाजी सुरू असताना शिवसेनेच्या नगरसेवकांनीही 'आवाज कुणाचा...शिवसेनेचा' अशा घोषणा देऊन उडी घेतली. दोन्ही पक्षाच्या घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेलं. तर दुसरीकडे प्रेक्षक गॅलरीमध्ये शिवसेनेचे नेते अनिल देसाई, अनिल परब, आदेश बांदेकर, अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. भाजपचे नेतेही प्रेक्षक गॅलरीत हजर होते. सेना- भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गॅलरीत  अखेर 'जमलं' असं म्हणत एकमेकांना हस्तांदोलन केलं,

मनसे नगरसेवक गैरहजर

निवडणुकीत पाणिपत झालेल्या मनसेचे सातही नगरसेवक मात्र गैरहजर होते. मनसेचे सातही नगरसेवक पक्ष कार्यालयात बसून होते. सर्व नगरसेवक पक्षाकडून कोणता आदेश येतो का ? याकडे लक्ष ठेवून होते. पण, कोणताही आदेश आला नाही. त्यामुळे सात निष्ठावंत नगरसेवकांनी गैरहजर राहणं पसंत केलं.

आमचं मत "प्राचार्य" विश्वनाथ महाडेश्वरांना

कुणीही उमेदवारी मागे न घेतल्यामुळे अखेर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, इथंही सावळागोंधळ पाहण्याचा मिळाला.  शिवसेनेच्या नगरसेवकांना प्रिन्सिपॉलसाठी मराठी मुख्याध्यापक शब्द माहिती नव्हता की काय असं झालं. मग विश्वनाथ महाडेश्वरांना प्रिन्सिपॉल उपाधी लावूनच सेनेच्या नगरसेवकांनी मतदान केलं. तर भाजपने आपलं मत "प्राचार्य" विश्वनाथ महाडेश्वरांना देत आहेत असं जाहीर करत मतदान केलं. विश्वनाथ महाडेश्वरांना 172 मतं मिळाली आणि महापौरपदी त्यांची निवड झाली. तर उपमहापौरपदासाठीही भाजपने सेनेच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे हेमांगी वरळीकर यांची उपमहपौरपदी निवड झाली.

काँग्रेस विरोधी बाकावर

महापौरपदाच्या शर्यतीत उडी घेतलेल्या काँग्रेसला इथं पराभवाला सामोरं जावं लागलं. एकूण 31 नगरसेवक असलेल्या काँग्रेसला 31 चं मत मिळाली. म्हणजे काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपल्यालाच मतदान केलं. तर दुसरीकडे भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे काँग्रेसचा विरोधी पक्षाचा मार्ग मोकळा झाला आहे. समाजवादी पक्षही महापौरांच्या निवडनुकीत तटस्थ राहिला.

पुन्हा घोषणाबाजीmumbai_sena_bjp (4)

महापौरपदाची निवड प्रक्रिया पार पडत असताना पुन्हा एकदा भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी सुरू केली. एकीकडे सेनेला मतदान करून भाजपच्या नगरसेवकांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न सुरू असता शिवसेनेच्या नगरसेवकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. भाजपकडून मोदींच्या घोषणा तर सेनेकडून बाळासाहेबांच्या घोषणांनी सभागृह पुन्हा दणाणून गेलं.

सेनेकडून भाजपचे आभारही नाही

भाजपने शिवसेनेच्या बाजूने मतदान करून महापौरपदाचा मार्ग मोकळा करून दिला.विश्वनाथ महाडेश्वर यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर त्यांनी भाजपकडे लगेच पाठ फिरवली.  त्यांनी भाजपचे आभार मानण्याची औपचारिकता सुद्धा पार पाडली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव राष्ट्रवादीच्या गटनेत्या झाल्या. तर मुमताज रैबर खान वाॅर्ड क्रमांक १०२ च्या अपक्ष नगरसेविका तटस्थ राहिल्या. त्यांनी भाजपला समर्थन दिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 8, 2017, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading