प्रेमाची शिक्षा ?, बापानेच केला तीनदा मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न

प्रेमाची शिक्षा ?, बापानेच केला तीनदा मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

08 मार्च : समाजात आजही महिलांच्या बद्दल अनेक समजगैरसमज जोपासले जातात. इज्जत इभ्रतीसाठी ग्रामीण भागात आजही मुलींचा बळी घेतला जातो. औरंगाबाद जिल्ह्यातील पोटच्या मुलीला तीनदा जीवे मारण्याचा प्रयत्न निर्दयी बापानं केलाय. मात्र ती मुलगी आज हिमतीनं सगळ्यांचा मुकाबला करते आहे.

abad_woman_day4ही आहे आधुनिक युगात जात पात विसरून प्रेम करणारी युवती...या उच्च जातीतील तरुणीनं दुसऱ्या जातीतल्या मुलावर प्रेम केलं. मुलीनं घराण्याची इज्जत घालवली या भावनेनं तिच्या वडिलांनी तिला पहाटे चार वाजता विहिरीत ढकलून दिलं. त्यातूनही ही धाडसी तरुणी वाचली. इज्जतीच्या प्रश्नासाठी पेटून उठलेल्या वडिलांनी त्यानंतर तिला विष पाजून ठार मारण्याचाही प्रयत्न केला.

हे सगळं एवढ्यावरच थांबलं नाही तर या निर्दयी बापानं पोटच्या पोरीचं जबरदस्ती विधुराशी विवाह लावून दिला. या तरुणीनं सामाजिक संघटनेशी संपर्क साधून आपली सुटका करून घेतली. पण अनाथालयात येऊन विकृत वडिलानं मुलीवर चाकू हल्ला केला

त्यातूनही ती बचावली..तिची स्वप्नं तिनं जागती ठेवली.

वडिलांनीच केलेल्या तीन हल्ल्यातून बचावलेली तरुणी आता सावरतीये. भगवान बाबा आश्रमात तिची काळजी घेतली जातेय.

ज्या जन्मदात्या बापानच तीनदा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तरीही त्या वडिलांच्या विरोधात या मुलीनं अजून तक्रार केलेली नाही..ती फक्त लढतीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2017 05:06 PM IST

ताज्या बातम्या