चंद्रकांत पाटील तुम्ही कर्जमाफी द्या,आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू-अजित पवार

चंद्रकांत पाटील तुम्ही कर्जमाफी द्या,आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू-अजित पवार

  • Share this:

ajit_pawar308 मार्च : चंद्रकांत पाटील तुम्ही दोन नंबरचे नेते आहात. जरा दुसऱ्या नंबरच्या पदासारखं काम करा. कर्जमाफीची घोषणा करा आम्ही सगळे तुम्हाला पाठिंबा देऊ, तुम्हाला मुख्यमंत्री करू असं आवाहनच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना दिलं.

विधानसभेत आज अजित पवारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी का जाहीर करत नाही. उद्योगपतींना हजारो कोटी माफ केले जातात. उत्तरप्रदेशमध्ये निवडून आल्यावर कर्जमाफी देऊ अशी घोषणा करता मग राज्यातही तुमचं सरकार आहे. मग इथं घोषणा का करत नाही अशा सवाल अजित पवारांनी उपस्थिती केला.

विजय मल्ल्या 9 हजार कोटी थकवून इंग्लंडला पळाला. पण सरकारला आमचा शेतकरी दिसत नाही का, अशा शब्दांत अजित दादांनी फडणवीस सरकारवर टीका केली. फडणवीस म्हणतात योग्य वेळी कर्जमाफी करू, सगळ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर जाहीर करणार का, असा संतापही अजित पवारांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2017 03:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading