परिचारकांच्या निलंबनाचा निर्णय सभापतींच्या कोर्टात

  • Share this:

paricharak408 मार्च : भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी माजी सैनिकांबद्दल केलेल्या वक्तव्याचे आजही विधानसभेत पडसाद उमटले. अखेर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत समिती नेमली असून अधिवेशन संपण्यापूर्वी निलंबित करण्याबाबत अहवाल देणार आहे.

आज सभापती ,मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक झाली. सभागृहाच्या सात सदस्यांची समिती नेमण्यात आली. ही समिती अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल देईल तोपर्यंत परिचारक यांना निलंबित करण्यात यावं की नाही याबाबत सभापती निर्णय घेतील असं चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितलं.

मात्र विरोधकांनी या समितीला विरोध दर्शवला आणि हौद्यात उतरून गोंधळ घातला. त्यामुळे विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 8, 2017, 3:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading