खडसेंविरोधात 1 आठवड्यात एफआयआर दाखल करा : हायकोर्ट

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 8, 2017 03:25 PM IST

court_khadse08 मार्च : पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसी वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

राज्य सरकारनं या प्रकरणाची चौकशी आपण पुणे पोलिसांकडून काढून एसीबीकडे सोपवण्यात आल्याची माहिती मुंबई हायकोर्टाला दिली. यावर मुंबई हायकोर्टाने एका आठवड्यात एसीबीने एफआयआर नोंदवावा असा आदेश दिला आहे.

त्यासोबतच या प्रकरणाची चौकशी अतिरिक्त महासंचालक या पदाखालील अधिकारी करणार नाही असं स्पष्ट केलंय. या प्रकरणाची सुनावणी ३ एप्रिलला होणार आहे. त्यामुळे एकंदरितच खडसेंना हा मोठा धक्का मानला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2017 03:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...