शायना एनसी सुरू करतायत महिलांसाठी हेल्पलाईन 8888809306

शायना एनसी सुरू करतायत महिलांसाठी हेल्पलाईन 8888809306

  • Share this:

shaina nc

08 मार्च : भाजप नेता शायना एनसी यांना काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं मेसेज पाठवून त्रास दिला होता.मात्र हे पहिलं प्रकरण नव्हतं कारण त्यापूर्वी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनाही अशाच स्वरूपाचे मेसेजस आले होते.पण शायना एनसी यावेळी फक्त पोलिसांकडे तक्रार करून थांबल्या नाहीयेत तर त्यापुढे जाऊन त्यांनी मुंबईतल्या महिलांसाठी हेल्पलाईन सुरू करण्याचं ठरवलंय.

आज महिला दिनाच्या निमित्तानं ही हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे.बऱ्याच महिलांना अश्लील किंवा अर्वाच्च मेसेजेसचा त्रास होत असतो.पण अशा वेळी काय करावं हे त्यांना कळत नाही.त्यामुळे अशा सर्व महिलांना या हेल्पलाईनवरून तक्रार नोंदवता येणार आहे.त्यावेळी या महिलांना नेमकं कुठे आणि कुणाकडे कशा प्रकारे तक्रार करावी याचं मार्गदर्शन केलं जाईल.गरज पडल्यास कायदेशीर मार्गदर्शनही

करण्यात येणार.

आय लव्ह मुंबई आणि सकाळ समुहाच्या संयुक्तिक प्रयत्नातून ही संकल्पना राबवली जाणार आहे.त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक आहे 8888809306.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 8, 2017, 11:32 AM IST

ताज्या बातम्या