...शक्तिमान परत येतोय!

...शक्तिमान परत येतोय!

  • Share this:

mukesh

08 मार्च : 90च्या दशकात प्रत्येक लहानग्याचा हिरो असलेला शक्तिमान परत येतोय. आणि ही माहिती खुद्द शक्तिमान व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मुकेश खन्नानं दिलीय.

मुकेश खन्ना एका शाळेत शक्तिमानच्या मेणाच्या प्रतिमेचं उद्घाटन करायला गेले होते. तिथे त्यांना बघून मुलांनी शक्तिमान शक्तिमान म्हणून आवाज दिला.

'शक्तिमान सीरिज पुन्हा परत आली पाहिजे. दूरदर्शन यासाठी तयार आहे. पण मला ही सीरियल सॅटेलाइट चॅनेलवर पाहिजे.' मुकेश खन्ना म्हणतात.

'बाहुबली'चं उदाहरण देत मुकेश खन्ना म्हणाले, ' मोठ्यांसाठी मोठ्या  बजेटचे सिनेमे बनतात. पण लहान मुलांसाठी हल्ली मोठे सिनेमे बनत नाहीत. निर्मात्यांना वाटतं की मुलांच्या सिनेमातून  जास्त पैसे मिळत नाहीत.'

एकूण काय, मुकेश खन्नांचा शक्तिमान पुन्हा एकदा भेटायला येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2017 08:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading