मुंबई पालिकेवर भगवा फडकला, महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर

मुंबई पालिकेवर भगवा फडकला, महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर

  • Share this:

mumbai_mhapoar

08 मार्च : मुंबईच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे नगरसेवक प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड झाली. तर, उपमहापौरदी सेनेच्या हेमांगी वरळीकर यांची वर्णी लागली. या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेच्या बाजूनं मतदान केलं.

मुंबईच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तोडीस तोड कामगिरी करणाऱ्या भाजपनं सुरुवातीला महापौरपदावर दावा सांगितला होता. त्यामुळं ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, अशी चिन्हं होती. मात्र, ऐनवेळी भाजपनं निवडणुकीतून माघार घेत शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं मुंबईत पुन्हा एकदा शिवसेनेचाच महापौर बसणार हे निश्चित झालं होतं.

मात्र, काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असल्यानं या पदासाठी आज ठरल्याप्रमाणे औपचारिक निवडणूक झाली. त्यात शिवसेनेच्या महाडेश्वर यांचा सहज विजय झाला. मनसेचे नगरसेवक गैरहजर राहिले.

खरंतर 8 मार्चला म्हणजे आज मुंबई महापालिकेची मुदत संपत आहे. त्यामुळे 9 मार्चला नवा महापौर बसवणं अपेक्षित होतं. मात्र महापालिका आयुक्तांनी एक दिवस आधीच म्हणजे 8 मार्चला महापौरपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, विश्वनाथ महाडेश्वर यांच्या महापालिका घराचा वाद बाहेर आल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणाचा कोर्टाचा निकाल महाडेश्वर यांच्या विरोधात गेला, तर त्यांचं महापौरपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 8, 2017, 9:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading