नगरसेवक फुटू नये म्हणून नाशिकमध्ये सेनेकडूनही गटनोंदणी

  • Share this:

shiv-sena07 मार्च : भाजपनं गटनोंदणी केल्यानंतर आज शिवसेनेनंही गटनोंदणी केली. पक्षफुटीचं ग्रहण हे प्रत्येक पक्षाला असल्यानं कायद्याचा धाक हा पक्ष नगरसेवकांना असावा याकरीता गटनोंदणी करण्यासाठी प्रत्येक पक्ष हा आग्रही आहे.

आता एल्गार सत्ताधारी भाजपविरोधात ही भूमिका सेनेच्या शिलेदारांनी जाहीर केल्यानं सत्ता जरी भाजपची असली तरी शिवसेना विरोधकांच्या भूमिकेत बसणार का ? हा प्रश्न उपस्थित झालाय.

यंदाच्या निवडणुकीत मुंबईसह पूर्ण राज्यात परदर्शकतेचा मुद्दा गाजला. पण आता भाजपनं उपस्थित केलेल्या याच मुद्द्याला शिवसेनेनं आपलं हत्यार बनवलंय. विभागीय आयुक्तांनी शिवसेनेच्या 35 सदस्यांची नोंदणी ओळ्ख परेड करून घेतली. सेनेसोबत असलेल्या सहयोगीची मात्र अनुपस्थिती होती. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक राहणार अशी ठाम भूमिका सेनेनं घेतल्यानं आता भाजपकडे स्पष्ट बहुमत असलं तरी पालिका सभागृह गाजणार हे नक्की.

 शिवसेना सदस्यांची गटनोंदणी

- 35 सदस्यांची विभागीय आयुक्तांनी घेतली ओळख परेड

- अपेक्षीत सहयोगी सदस्य मात्र गैरहजर

- सेना सदस्य पाळणार खरी पारदर्शकता

- अनेकांना महापौरपदासाठी संधी देऊन विकास होत नाही

- भाजपला पारदर्शक कारभार करावाच लागेल

- नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, सेनेची भूमिका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 7, 2017, 8:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading