भूखंड प्रकरणी खडसेंविरोधात पुरावे नाही, सरकारकडून कोर्टात माहिती

  • Share this:

court_khadse07 मार्च :  भोसरीतील एमआयडीसी भूखंड खरेदी प्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणासारखे कोणतेही पुरावे आढळून आले नसल्याचं राज्य सरकारतर्फे पुन्हा एकदा आज मुंबई हायकोर्टाला सांगण्यात आलं आहे.

मागील सुनावणी वेळीही पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्याचे सीनिअर इन्सपेक्टर एम के बहाद्दरपुरे कोर्टाला ही माहिती दिली होती. आज कोर्टाने राज्य सरकारला तुम्ही तपास अधिकाऱ्याची भूमिका मांडत आहात की राज्य सरकारची त्यावरील भूमिका मांडत आहात असा सवाल केला.

याचिकाकर्ते हेमंत गवंडे यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी आणखी वेळ हवा असल्याचं राज्य सरकारनं म्हटल्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. ही याचिका दाखल होऊन आता आठ महिने झाले असून इतक्या दिवसात उत्तर का दिलं नाही असा सवाल करत उद्या पुन्हा सुनावणी ठेवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2017 08:33 PM IST

ताज्या बातम्या