खिद्रापुरेला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

खिद्रापुरेला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

  • Share this:

khidrapure_07 मार्च : सांगलीतल्या म्हैसाळ अवैध गर्भपात प्रकरणातला आऱोपी डॉ खिद्रापुरेला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर दुसरीकडे खिद्रापुरेच्या हाॅस्पिटलमागे आणखी एक एक्सरे मशीन सापडलंय.

अवैध गर्भपात प्रकरणात डाॅ. खिद्रापुरेला बेळगावातून अटक करण्यात आलीये.  बाबासाहेब खिद्रापुरे या नराधम डॉक्टरच्या रुग्णालयामागे आणखी एक एक्सरे मशीन सापडलंय. भारती रुग्णालयामागे पालापाचोळ्यामागे हे मशीन लपवून ठेवलं होतं. सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेनं हे मशीन शोधून काढलं. दुसरी गोष्ट म्हणजे खिद्रापुरे हे अमानुष धंदे गेल्या ८ वर्षांपासून करतोय, सापडलेल्या १९ पैकी ८ भ्रूणांची डीएनए चाचणी होणार आहे. उरलेले ११ भ्रूण हे कुजलेले असल्यामुळे त्यांची डीएनए चाचणी शक्य नाहीय, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

दरम्यान, म्हैसाळमधील रॅकेट खूप मोठं आहे. यात सांगली, सातारा, मिरज येथील अनेक डॉक्टर येथे आणून गर्भपात करून घ्यायचे. यात या भागातील अनेक प्रथितयश डॉक्टरांचा समावेश आहे अशी माहिती आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी विधिमंडळात दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2017 08:02 PM IST

ताज्या बातम्या