कशासाठी शौचालयासाठी!, गरोदर महिलेनं 3 दिवस खणला खड्डा

कशासाठी शौचालयासाठी!, गरोदर महिलेनं 3 दिवस खणला खड्डा

  • Share this:

sushila207 मार्च : गरोदरपणाचा काळ म्हणजे त्या स्त्रीच्या आयुष्यातला एक फार महत्त्वाचा काळ. या काळात तिच्यासोबत आणखी एक जीव तिच्यावर अवलंबून असतो. जसेजसे महिने भरत जातात तशी प्रकृतीची आणखी काळजी घ्यावी लागते. पण पालघर जिल्हयातील नांदगावच्या सुशीला खुरकुटे या महिलेने सात महिन्याची गरोदर असताना, धैर्याने तिच्या घराजवळ तिने तब्बल तीन दिवस राबत खड्डा खणला हे सगळं कशासाठी? तर आपल्या घराचं स्वतंत्र शौचालय असावं या एकाच ध्येयासाठी..! सुशीलाच्या या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतलीये. सुशीला ८जानेवारी जागतिक महिला दिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यातील नांदगाव या गावात राहणाऱ्या सुशीला खुरकुटे हीने एक आदर्श देशापुढे ठेवला आहे.  सुशीलाचं हे तिसरं बाळंतपण. गावातल्या अनेक घरांसारखंच तिच्या घरात शौचालय नव्हतं. त्यामुळे तिला आणि तिच्या मुलांना उघड्यावर शौचाला जावं लागत होतं. बाळंतपणाच्या अवस्थेत साहजिकच सुशीलाचीही अशा वेळी कुचंबणा होत होती.  बाळंतपणाच्या काळात गरोदर महिलेला योग्य आहार मिळणं फार महत्त्वाचं असतं. पण शौचाला जावं लागेल या भीतीने त्या खाणं ही टाळतात. आपल्या तिसऱ्या बाळंतपणाच्या वेळी ही परिस्थिती बदलण्याचा तिनं निश्चय केला. आणि सात महिन्याची गरोदर असतानाही तिने आपल्या घरामागे शौचालयासाठी खड्डा खणण्याचं धाडसं दाखवलं.

sushila1त्यांच्या गावातली धडधाकट माणसं सरकारनं काम करण्याची वाट पाहत असताना सुशीलाने दिलेल्या या एकाकी लढयाकडे आज  सगळ्यांचं लक्ष वेधलं  जातं आहे. त्यांच्या या प्रयत्नांची दखल थेट केंद्र सरकारने घेतली आणि केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचे सचिव परमेश्वर अय्यर यांनी ट्वीट करत सुशीलाच्या कष्टांची दखल घेतली. आणि तिला  लगेच एक शौचालयही बनवून  दिलं.  जागतिक महिला दिनानिमित्त अहमदाबादला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचा सन्मान ही करण्यात येणार आहे.

sushila4नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणं हे सरकारचं कामच आहे. पण सुस्त सरकारी यंत्रणा हलायला अनेक वेळा कितीतरी वर्षं लागतात. आणि अनेकदा आपण आपल्या निष्क्रीयतेचं खापर सरकारवर फोडतो.  सुशीलाने या सगळ्या विचारांमध्ये वेळ घालवलाच नाही. सात महिन्यांची गर्भावस्था असतानाही सुशीलाने शौचालयासाठी खड्डा खणायला सुरूवात केली.  सरकारी मदत येवो वा न येवो ती मदत मिळाल्यावर आपल्या बाजूने अपेक्षित असलेलं काम पूर्ण असलं पाहिजे याच एका उद्दिष्टाने त्या तब्बल तीन दिवस राबली.  तिच्या या कार्याची गोष्ट,  राज्य सरकारच्या हागणदारीमुक्त गावाच्या योजनेत लोकांना सांगून जनजागृती ही केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 7, 2017, 7:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading