...आणि मुख्यमंत्र्यांसोबत 'त्या'चा फोटो काढण्यासाठी धनंजय मुंडे झाले 'कॅमेरामॅन'

...आणि मुख्यमंत्र्यांसोबत 'त्या'चा फोटो काढण्यासाठी धनंजय मुंडे झाले 'कॅमेरामॅन'

  • Share this:

dhanjay_munde307 मार्च : सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील गेल्या काही दिवसांत ताणले गेले संबंध राज्यातील लोकांनी अनुभवले. पण उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलीच्या लग्नात विरोधक आणि मुख्यमंत्र्यांचे काही हसरे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. एक लहान मुलाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत फोटो  काढण्याचा आग्रह केला पण फोटो काढण्यासाठी त्याने मोबाईल  विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हातात दिला आणि त्यांनीही मुख्यमंत्र्यांसह या मुलाचा फोटो काढला.

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कन्या पायल हिचा लग्न सोहळा आज नागपुरात थाटात पार पडला. कोराडी येथील महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात हजारो लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी लावली होती.

या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. वधु-वराला आशिर्वाद दिल्यानंतर व्यासपीठावर एका मुलाला मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्याची इच्छा झाली. तो मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उभा राहिला. पण, फोटो कोण काढणार ?, असा प्रश्न निर्माण झाला. तितक्यात समोर विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आले. त्या मुलाने मोबाईल त्यांच्या हाती दिला आणि 'दादा एक फोटो काढाना' अशी प्रेमळ विनंती केली. धनंजय मुंडे यांनीही त्याच्या मागणीला मान देत मोबाईलमध्ये फोटो काढला. मुख्यमंत्र्यांनीही स्मित हास्य करत दाद दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2017 06:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading