पराभवाचा वचपा काढला, भारताने कांगारुंना लोळवलं

पराभवाचा वचपा काढला, भारताने कांगारुंना लोळवलं

  • Share this:

r ashvin07 मार्च : पुण्यामध्ये झालेल्या लाजीरवाण्या पराभवाचा वचपा काढत भारताने कांगारूंना लोळवलं. बंगळुरू कसोटीत भारताने  आॅस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीये. आर अश्विन आणि रवींद्र जाडेजा विजयाचे शिल्पकार ठरले.

बंगळुरु कसोटीत चौथ्या दिवशी भारताने 274 रन्स करून आॅलआऊट झाली. भारताने आॅस्ट्रेलियासमोर 188 धावांचं टार्गेट दिलं. पण, हे माफक आव्हान आॅस्ट्रेलियन टीम पैलू शकली नाही.

याआधी पहिल्या इनिंगमध्ये आॅस्ट्रेलियानं टीम 276 रन्सवर आॅलआऊट झाली. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 6 विकेट घेतल्यात. तर आर.अश्विनने 2 विकेट घेऊन खातं उघडलं. दुसरीकडे आॅस्ट्रेलियाकडून रैनशाॅ 60, शाॅन मार्श 66 आणि मैथ्यू वेड 40 रन्स बनवले.

आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसापर्यंत 237 धावांपर्यंत मजल मारली होती.  त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 274 धावांवर गारद झाली. त्यामुळे मोठी आघाडी न मिळाल्यामुळे टीम इंडिया पुन्हा पराभूत होते की काय अशी पाल चुकचुकली. मात्र, रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने शानदार खेळी पेश करत कांगारूंची दाणादाण उडवली.  अश्विनने सहा जणांना तंबूचा रस्ता दाखवून आॅस्ट्रेलियान टीमची हवा काढून टाकली आणि 112 रन्समध्ये आॅस्ट्रेलियाचा खुर्दा पडला. भारताने 75 रन्सने विजय मिळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2017 04:58 PM IST

ताज्या बातम्या