अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस; शेतकरी कर्जमाफी गाजणार?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस; शेतकरी कर्जमाफी गाजणार?

  • Share this:

प्राजक्ता पोळ,   मुंबई

07  मार्च : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. दोन्ही सभागृहात काल (सोमवारी) पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव झालेत. त्यामुळे आजपासून कामकाजाला खऱ्या अर्थाने सुरवात होईल. राज्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या, अशा परिस्थितीत सरकारचा जाहिरातीवर झालेला खर्च या मुद्यावर विरोधक सरकारची कोंडी कारण्याची शक्यता आहे. याच मुद्यांचा आधार घेत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी हि मागणी विरोधक लावून धरतील अशी चिन्ह आहेत.

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. यंदा कर्जमाफी, जवानांच्या पत्नींबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान..., कृषीमालाला न मिळणारा भाव या मुद्यांवर विरोधक आक्रमक आहेत. तर बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी काल आमदार महेश लांडगे यांनी मनोरा आमदार निवास ते भाजप कार्यालयापर्यंत बैलगाड्या नेऊन आंदोलनही केलं.

vidhan

काल पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाच्या सुरूवात झाली. अभिभाषण संपत असताना राज्यपालांसमोर विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणाबाजी केली. सभागृह सुरू झाल्यानंतर विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी जवानांच्या पत्नींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत त्यांना निलंबित करण्याची मागणी विरोधकांनी केली. जोपर्यंत आमदार परिचारक यांना निलंबित करण्यात येणार नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

परिचारक यांचं निलंबन आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बरोबरच बैलगाडी शर्यतीला मंजुरी देण्यासाठी केलेलं आंदोलनही लक्षवेधी ठरलं. बैलगाड्या शर्यतींना मंजुरी देणारं विधेयक या अधिवेशनात आणावं यासाठी आमदार महेश लांडगे यांनी बैलजोड्या आणून आंदोलन केलं. मनोरा आमदार निवास ते भाजप कार्यालयापर्यंत बैलगाड्या नेऊन मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातलं निवेदन दिलं. मुख्यमंत्र्यांनी याबाबतचं आश्वासनही लांडगे यांना दिलं आहे.

अधिवेशनाचा पहिला दिवस काही घडामोडींनंतर स्थगित झाला तरी येणाऱ्या दिवसात विरोधकांची ही आक्रमकता सभागृहात कायम राहते की यावेळीही सरकार विरोधकांना न जुमानता कामकाज पुढे नेते हे बघणं महत्वाचं असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 7, 2017, 10:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading