मुंबईसोबतच नागपूर महानगरपालिकेतही उपलोकायुक्तांची नियुक्ती का नाही ?

मुंबईसोबतच नागपूर महानगरपालिकेतही उपलोकायुक्तांची नियुक्ती का नाही ?

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, नागपूर  

07 मार्च : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत माघार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी उपलोकायुक्तांची नियुक्ती करण्याची घोषणा केली. पण मुंबई सोबतच नागपूर महानगरपालिकेतही उपलोकायुक्तांची नियुक्ती का नाही असा सवाल विचारला जातोय.

NMC

मुंबई महापालिकेत अनेक घोटाळ्यांमुळे शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर मुंबई  महापालिकेत उपलोकायुक्तांची नियुक्ती करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. पण गेल्या दहा वर्षांत झालेल्या नागपूर महानगरपालिकेतील घोटाळ्यांबाबत कारवाई तर दूर पण आता उपलोकायुक्त का नाही असा सवाल काँग्रेसनं विचारला आहे.

शिवसेनेसाठी महापौर पदाच्या निवडणूकीत माघार घेत्यल्यानंतरही दोन्ही पक्षातील मतभेद कायम आहेत. मुंबई महापालिकेत उपलोकायुक्ताची नियुक्ती केल्यावर नागपूरमध्येही नियुक्तीसाठी शिवसेना सरसावली आहे. कॅबिनेट बैठकीत तर शिवसेनेच्या मंत्र्यांनीच नागपूर महानगर पालिकेत उपलोकायुक्त नियुक्त करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान नागपूर महानगरपालिकेत पूर्ण बहुमत असल्यामुळे नागपुरात उपलोकायुक्तांची गरज नसल्याचं नागपूरच्या महापौरांनी म्हटलंय. नागपूर महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका हे दोन स्वतंत्र विषय असल्याचं भाजपच्या नेत्यांचंही म्हणणं आहे.

नागपूर महानगरपालिकेत पारदर्शकतेतून  कारभार करणार असल्याचं भाजपचा दावा असला तरी स्टार बस, कचरा उचलण्याचे खाजगीकरण आणि पाण्याचे भरमसाठ बिल या प्रश्नांवर नव्या महापौरांनी लक्ष देण्याची गरज असल्याचं नागरिकांनी म्हटलंय. पण तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपनं जर महापालिकेतील घोटाळेबाजांवर कारवाई केली नाही तर दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 7, 2017, 9:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading