गर्भपात रॅकेटचा सूत्रधार खिद्रापुरेला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

  • Share this:

 sangali_khirdapure

07 मार्च : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सांगलीतील गर्भपात रॅकेटचा प्रमुख सूत्रधार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेला  17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

19 गर्भांची हत्या करणारा डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला मंगळवारी पहाटे बेळगावमधून अटक करण्यात आली. मिरज पोलीसांनी ही कारवाई केलीये. सांगली पोलिसांची  5 तपास पथक संपूर्ण राज्यात खिद्रापुरेचा शोध घेत होती. अखेर त्याला बेळगावमधून अटक करण्यात आली.

सांगलीत गर्भपातादरम्यान स्वाती जमदाडे नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान म्हैसाळ गावातील डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेच्या भारती हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात करण्यात येत असल्याचं उघड झालं. स्वाती जमदाडेचा मृत्यू देखील म्हैसाळमधील याच भारती हॉस्पिटलमध्ये झाला होता. हॉस्पिटलजवळच्या परिसरात पोलिसांनी तपास केला असता त्यांना 19 मृत अर्भकं सापडली.

खिद्रापुरे बीएचएमएस असून मूळचा शिरोळ मधील नरवाडचा रहिवासी आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्याचं म्हैसाळमध्ये हॉस्पिटल आहे. अनेक वर्षांपासून तो नियमबाह्य पद्धतीनं गर्भपात करत असल्याचा आरोप आहे. या व्यवसायात त्याची पत्नी देखील सहभागी असल्याची शक्यता आहे.

Loading...

खिद्रापुरेच्या दवाखान्यावर झालेल्या कारवाईनंतर तो फरार होता.  याप्रकरणी डॉ. खिद्रापुरे याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात असून त्याला साडेदहा वाजता मिरज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2017 01:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...