लवकरच मुंबईकरांना पेंग्विन दर्शन !

लवकरच मुंबईकरांना पेंग्विन दर्शन !

  • Share this:

penguin_mumbai06 मार्च : शिवसेनेचा महत्वाकांक्षी पेंग्विन प्रकल्प अखेर मार्गी लागलाय. आठवड्याभरात सर्वसामान्यांना पेंग्विन पहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

दक्षिण कोरियातून काही महिन्यांपूर्वी या राणीबागेत 8 हंबोल्ट पेंग्विन  आणण्यात आले. त्यापैकी एकाचा काही महिन्यांपूर्वी संसर्गाने मृत्यू झाला. त्यामुळे अन्य पेंग्विनना सध्या इंटेरपिटिशन सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यासाठी असलेल्या काचेच्या पिंजऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यांना आता नव्या घरात हलवण्यात आलंय.

आज सकाळी ६ पेंग्विनना त्यांच्या नव्या घरात हलवण्यात आलंय. मुख्य म्हणजे हा प्रकल्प येत्या आठवड्यात नव्या महापौरांच्या हस्ते उद्धाटन करण्याचा शिवसेनेचा मानस आहे.  त्यामुळे शिवसेनेच्या जुन्या पदाधिकाऱ्यांचा हिरमोड होणार असला तरी अखेर हा प्रकल्प मार्गी लागल्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडलाय.

पेंग्विन पाहण्यासाठी मोजावे लागणार 100

राणीबागेतील प्रवेश शुल्क दहा पटीने वाढवण्यात आले आहे. विशेष म्हणजे पेंग्विन पाहण्यासाठी पालकांना 100 रुपये आणि 12  वर्षांखालील मुलांना 50 रुपये मोजावे लागणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2017 10:34 PM IST

ताज्या बातम्या