शिवस्मारकाच्या जाहिरातीवर आकस्मिकता निधीतून ८ कोटींचा खर्च

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 6, 2017 10:09 PM IST

शिवस्मारकाच्या जाहिरातीवर आकस्मिकता निधीतून ८ कोटींचा खर्च

shiv_samarkप्रफुल्ल साळुंखे, मुंबई

06 मार्च : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा गाजावाजा करत फडणवीस सरकारने अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवाजी महाराजाच्या स्मारकाचा भूमिपूजन आणि जलपूजन सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पाडला. या सोहळ्याच्या जाहिरातीसाठी तब्बल 18 कोटी खर्च करण्यात आलाय. त्याहुन धक्कादायक म्हणजे यासाठी 8 कोटी आकस्मिकता निधीतून खर्च केल्याचं समोर आलंय.

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला  सुरूवात झाली. कर्जमाफी, जवानांच्या पत्नींबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान... कृषीमालाला न मिळणारा भाव या मुद्यांवर पहिल्याच दिवशी  विरोधक आक्रमक होते. राज्‍य सरकारने ११ हजार १०४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजुरीसाठी विधिमंडळात सादर केल्‍या. सरकारने गेल्‍या दोन वर्षांत सुमारे  8० हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्याचा विक्रम नोंदवल्या आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात भाजपने शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं. या भूमिपूजन सोहळ्यासाठी फडणवीस सरकारने संपूर्ण मुंबईत पोस्टर, होर्डिंग, वृतपत्रात आणि वृत्तवाहिन्यांवर या कार्यक्रमाच्या जाहिरातीही दिल्या होत्या.  समुद्रात जलपूजन करण्यासाठी गिरगाव चौपाटीवर तीन हाॅवरक्राॅफ्ट तैनात करण्यात आली होती. त्यानंतर कुर्ल्यातील बीकेसी मैदानावर विविध प्रकल्पांचं उद्घाटनही पार पडलं. या सोहळ्याच्या प्रसिद्धीसाठी  राज्य सरकार तब्बल 18 कोटी रुपये खर्च केले होते.  प्रसिद्धीसाठी राज्यभरात जवळपास 5 हजार होर्डिंग्ज लावण्यात आले होते. यातील 1800 होर्डिंग्ज हे माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या मालकीचे आहेत, तर उर्वरित होर्डिंग्जसाठी सरकार भाडे भरलंय.

या जाहिरातींसाठी आकस्मिकता निधीतून ८ कोटींचा खर्च करण्यात आल्याची बाबसमोर आलीये. शासनाच्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभाच्या जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी सरकारने आकस्मिकता निधीतून तब्बल आठ कोटी रुपये खर्च केले आहेत.  पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचे जल पूजन आणि विविध इन्फ्रास्टक्चर प्रकल्पांचे बीकेसीमध्ये  भूमिपूजन करण्यात आले. त्याच्या जाहिरातीसाठी 8 कोटी तातडीने खर्च करायचे म्हणून आकस्मिकता निधी मधून हा पैसे घेण्यात आल्याची बाबसमोर आलीये.

Loading...

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली असून त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी आणखी १४ कोटींची तरतूद  करण्यात आलीय. राज्यात जानेवारी ते डिसेंबर २०१६ या वर्षभरात तब्बल ३०५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अर्थसह्यय करण्यासाठी पुरवणी मागण्याद्वारे मोठी तरतूद करावी लागली आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अर्थ साहाय्य देण्यासाठी १४ कोटी ७ लाख ७८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पुरवणी मागण्या कशासाठी

राज्‍यातील कृषिपंपधारक शेतकरी,यंत्रमागधारक तसंच विविध वीज ग्राहकांना दिलेल्‍या अर्थसहायावरील खर्चासाठी २ हजार ८०४ कोटी ७२ लाख रूपयांची तरतूद करण्यात आलीय. आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी १४ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.  २०१५-१६ या आर्थिक वर्षात सरकारने ३५,३७४ कोटी रुपयांच्या तर चालू आर्थिक वर्षांत ३३ हजार ५९३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर  केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2017 10:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...