ठाण्यात जुन्या नोटांना फुटले 'पाय', तब्बल 1 कोटी 35 लाख जप्त

ठाण्यात जुन्या नोटांना फुटले 'पाय', तब्बल 1 कोटी 35 लाख जप्त

  • Share this:

thane_note06 मार्च : ठाण्यामध्ये जुन्या नोटांना पाय फुटले की काय अशी शंका निर्माण झालीये. मागील दोन आठवड्यापासून जुन्या नोटा सापडण्याचं सत्र सुरूच आहे. उपवन इथं तब्बल 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

ठाणे वर्तकनगर पोलिसांनी उपवन येथील राजेश गार्डन हॉटेल जवळ सापळा रचून 1 कोटी 35 लाख 96 हजारांच्या जुन्या पकडल्यात. यामध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतलंय. तर एक वाहन जप्त करण्यात आलंय. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसातली ही तिसरी घटना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 6, 2017, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading