खिद्रापुरे तळघरातच चालवायचा गर्भपाताचा अड्डा, ड्रॉव्हरमध्ये सापडले भ्रूण

खिद्रापुरे तळघरातच चालवायचा गर्भपाताचा अड्डा, ड्रॉव्हरमध्ये सापडले भ्रूण

  • Share this:

sangali_khirdapure06 मार्च : म्हैशाळ येथील गर्भपात प्रकरणी धक्कादायक बाबी आता समोर येत आहे.  डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे यांने आपल्या भारती हॉस्पिटलच्या तळघरातच गर्भपाताचा अड्डा उघडला होता. गर्भपाताची केस आणण्यासाठी त्याने एक एजंट नेमला होता. प्रत्येक गर्भपात करण्यासाठी 25 हजार रुपये तो घ्यायचा आणि एजंटला 10 हजार रुपये कमिशन द्यायचा. धक्कादायक म्हणजे, हाॅस्पिटलच्या ड्रॉव्हरमध्ये भ्रूण सापडल्याची घटनाही समोर आलीये.

खिद्रापुरेच्या हाॅस्पिटलच्या तळघरात ज्या ठिकाणी गर्भपात केला जात होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे दिसून आले आहे.  तळघरात एक मोठा खड्डा ही असल्याचे दिसून आले आहे. या हॉस्पिटलमध्ये काही औषधही  सापडली. या छापे मारी दरम्यान हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्याचे साहित्य आणि महत्वाची कागद पत्रही सापडली.

फरार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे यांच्या शोधासाठी  पोलिसांची पाच पथक रवाना झाले आहे. मिरज पोलिसांची तीन पथक आणि एलसीबी आणि गुंडा विरोधी पोलीस पथकाचे प्रत्येकी एक अशी पोलिसांची पाच पथक रवाना केली आहेत.

जमिनीत पुरलेल्या 19 पिशव्या  सापडल्या होत्या.  पिशव्यामध्ये मृत अर्भकाचे अवशेष आणि हाडे होती. आणखीन काही गर्भपात केल्याची शक्यता आहे. पोलिसांचा तपास गतीने सुरु आहे.

तसंच या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाचे पथक नियुक्त केले असून पथकात पाच लोकांचा समावेश केला आहे  गर्भपात प्रकरणाची सखोल चौकशी हे पथक करणार आहे.

खिद्रापुरे यांच्या भारती हॉस्पिटल मध्ये एक  गर्भपात करण्यासाठी पंचवीस हजार रुपये घेतले जात होते अशी सूत्रांची माहिती आहे.

या पंचवीस हजारा पैकी 15 हजार रुपये हे डॉक्टर  बाबासाहेब खिद्रापुरे घेत असे आणि 10 हजार रुपये हे एजंट घेत असे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कोण आहे डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे ?

मूळचा कोल्हापूरमधल्या शिरोळ तालुक्यातल्या कनवाड गावचा

10 वर्षांपासून सांगलीतल्या म्हैसाळ इथं प्रॅक्टीस

खिद्रापुरेची पत्नीही डॉक्टरच

तिचा दवाखाना नरवाडला

सात वर्षांपूर्वी म्हैसाळला खिद्रापुरेनं

हा दवाखाना बांधला

गेल्या तीन ते चार वर्षांपासून इथं बेकायदेशीररित्या गर्भपात होत असल्याचा संशय

दवाखान्याच्या परिसरात सापडल्या भ्रूणांचे अवशेष असलेल्या 19 पिशव्या

हॉस्पिटलवर कारवाई झाल्यावर 24 तासानंतरही डॉक्टर खिद्रापुरे बेपत्ता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 6, 2017, 4:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading