ठाण्याच्या महापौरपदी मीनाक्षी शिंदेंची बिनविरोध निवड

ठाण्याच्या महापौरपदी मीनाक्षी शिंदेंची बिनविरोध निवड

  • Share this:

thasne mayor

06 मार्च :  ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे रमाकांत मढवी विराजमान झाले आहेत. भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीनेही महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे शिवसेनेचा मार्ग सुकर झाला.

मुंबईपाठोपाठ ठाण्याच्या महापौरपदाच्या शर्यतीतून भाजपने सकाळीच माघार घेतली होती. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं ठाणे भाजपचे अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितलं.

ठाणे महानगर पालिकेच्या 131 जागांपैकी शिवसेनेनं सर्वात जास्त 63 जिंकून एक हाती सत्ता मिळवली आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने 34 जागा, भाजपने 23, काँग्रेस 3, एमआयएम 2 आणि अपक्ष 2 असे एकूण संख्या बळ  आहे. ठाण्याच्या महापौरपदासाठी आज निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी शिवसेनेतर्फे मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदासाठी रमाकांत मढवी यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून आशा सिंह आणि मुकेश मोकाशी यांनी अर्ज भरला होता, मात्र आता तो मागे घेण्यात येणार आहे.

दरम्यान, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीवेळी खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. महापौर निवडणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी सेनेने जय्यत तयारी केली आहे. पालिकेच्या प्रवेश द्वारावरच हत्ती आणि पालिकेच्या आवारात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळाही उभारण्यात आला आहे. पालकमंत्र्यांनी स्वता: या सगळ्याचा आढावा घेतला आहे. महापौर निवडणुकीनंतर मोठी रॅली काढण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 6, 2017, 11:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading