जादूटोणा केला म्हणून महिलेला बुडवून मारण्याचा प्रयत्न

जादूटोणा केला म्हणून महिलेला बुडवून मारण्याचा प्रयत्न

  • Share this:

gadchiroli

06 मार्च : गडचिरोलीत एका वृद्ध महिलेला जादूटोणा केला म्हणून जबर मारहाण करण्यात आलीय..पोहरी मडावी असं या महिलेचं नाव आहे. एका वनरक्षकाचा नुकताच मृत्यू झाला, आणि त्यासाठी या महिलेनं जादूटोणा केला होता,तिच्या या कृत्यामुळेच तो मरण पावला, असा निष्कर्ष त्याच्या घरच्यांनी काढला.

त्यांनी जातपंचायतीला हाताशी धरून याचा ठपका या वृद्ध महिलेवर ठेवण्यात आला. तिला 3 वेळा नदीत बुडवण्यात आलं. तरीही ती बुडाली नाही, म्हणून रात्री तिच्या घरी जाऊन संपूर्ण कुटुंबीयांना मारण्यात आलं.

एटापल्ली तालुक्यातल्या कांदोळी गावातली ही घटना आहे. या महिलेवर अहेरी उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एटीपल्ली पोलीस याचा तपास करतायेत. पण अजून कुणालाही अटक झालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 6, 2017, 9:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading