बेकायदा गर्भपात करणारा डाॅ. खिद्रापुरे फरार,जमिनीत पुरलेल्या 19 भ्रूण अवषेश पिशव्या

बेकायदा गर्भपात करणारा डाॅ. खिद्रापुरे फरार,जमिनीत पुरलेल्या 19 भ्रूण अवषेश पिशव्या

  • Share this:

khidrapure

06 मार्च : सांगलीतल्या म्हैसाळमध्ये बेकायदेशीररित्या गर्भलिंग चाचणी करून गर्भपात केल्याच्या संशयावरून मिरज ग्रामीण पोलिसांनी म्हैसाळमधील डॉ. खिद्रापुरेच्या हॉस्पिटलवर कारवाई केली. या प्रकरणात म्हैसाळ परिसरात जमीन जेसीबीने खोदून जमिनीत पुरलेल्या 19 पिशव्या बाहेर काढण्यात आल्यात. या पिशव्यामध्ये मृत भ्रूणांचे अवशेष आणि हाडे सापडलीयेत.

या प्रकरणी पोलिसांनी गर्भपाताचं साहित्य, भूल रजिस्टर, बिल रजिस्टर, जप्त करण्यात आलंय. तीन दिवसापूर्वी स्वाती जमदाडे या महिलेचा मृत्यू झाला होता. गर्भपात करण्यासाठी तिचा नवरा प्रवीण जमदाडे तिला घेऊन आला होता. त्यावेळेस तिला अतिरक्तस्त्राव झाल्यानं तिचा मृत्यू झाला.

तिच्या माहेरच्यांना याबाबत संशय आल्यानंतर तिचा नवरा प्रवीण जमदाडेला अटक झाली. त्यावेळेस प्रवीणनं हा गर्भपात डॉ. खिद्रापुरेनं केल्याचं मान्य केलं आणि अर्भकाचा मृतदेह गाडल्याची जागा दाखवली. तिथे खणल्यानंतर आणखीही अर्भकांच्या मृतदेहांचे अवशेष सापडले आणि हा भयानक प्रकार समोर आला. हॉस्पिटलवर कारवाई झाल्यापासून डॉ. खिद्रापुरे बेपत्ता झालाय.

24 तासांनंतरही डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेला अटक झालेली नाही. खिद्रापुरेच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथकं रवाना झालीयेत. मिरज पोलिसांची तीन पथकं आणि क्राईम ब्रँचची पथकं फरार खिद्रापुरेला शोधण्यासाठी रवाना झालीयेत.

कोण आहे डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे ?

हा मूळचा कोल्हापूरमधल्या शिरोळ तालुक्यातल्या कनवाड गावचा.10 वर्षांपासून सांगलीतल्या म्हैसाळ इथं प्रॅक्टीस करतोय.खिद्रापुरेची पत्नीही डॉक्टर आहे.तिचा दवाखाना नरवाडला आहे.

सात वर्षांपूर्वी म्हैसाळला खिद्रापुरेनं हा दवाखाना बांधला. गेल्या तीन ते चार वर्षांपासून इथं बेकायदेशीररित्या गर्भपात होत असल्याचा संशय होताच. खिद्रापुरेचा तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

>

First published: March 6, 2017, 11:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading