रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

  • Share this:

local-train-arrives-at-the-station-during-rush-hour

06 मार्च :  मध्य रेल्वेच्या भायखळा आणि चिंचपोकळी रेल्वेस्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. स्लो ट्रॅकवरच्या रुळाला तडा गेल्याने सीएसटी स्टेशनवरून सुटणाऱ्या स्लो ट्रेन उशिराने धावत आहेत. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांचा संताप उडाला आहे.

त्यात स्लो ट्रॅक वरच्या ट्रेन्स फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत. परिणामी मध्य रेल्वेचे एकूणच वेळापत्रक कोलमडलं आहे. सोमवारी सकाळीच ही घटना घडल्याने कार्यालय गाठण्याच्या धावपळीत असणाऱ्या मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवातच विलंबाने झाली आहे.

या सगळ्याचा फटका ठाणे आणि कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. त्यामुळे आता ही वाहतूक पूर्ववत होईपर्यंत डाऊन दिशेच्या प्रवाशांना कसरत करावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 6, 2017, 9:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading