06 मार्च : गेला महिनाभर एकमेकांना पाण्यात पाहिल्यानंतर आणि यथेच्छ टीका केल्यानंतर शिवसेना आणि भाजपा नेत्यांनी आज पुन्हा एकमेकांच्या गळाभेटी घेतल्या. निमित्त होत अधिवेशनाच्या पार्श्वभुमिवर मुख्यमंत्र्यानी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमाचं. निवडणुकानंतर सेना- भाजपाचा आता सेंकड हनिमून सुरू झाला आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकी दरम्यान सेना नेते रामदास कदम यांनी भाजपावर यथेच्छ टीका केली होती. मात्र हेच कदम आज मुख्यमंत्र्याच्या चहापान कार्यक्रमात भाजपा मंत्र्याच्या गळ्यात गळे घालून मिठ्या फिरताना दिसत होते. सरकारसोबत आपलं मंत्रीपदही वाचल्याचा आनंद कदम यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
निवडणुक काळात मंत्रीपदाचा राजीनामा खिशात घेउन फिरणा-या शिवसेनेच्या मंत्र्याची आज मात्र भाषा बदललीय. सध्या राजीनामे खिशातून काढून ठेवले आहेत असं सांगत निवडणूक काळात आम्ही राजीनाम्याचा स्टंट केला होता हेच सेनेच्या मंत्र्यानी स्पष्ट केलंय.
एकूणच काय, तर निवडणुकीपुरत शत्रूत्व आणि नंतर सत्तेसाठी एकत्र हा सेना -भाजपाचा दिल दोस्ती दोबारा पँटर्न महाराष्ट्राने पुन्हा एकदा अनुभवलाय. निवडणुकानंतर सेना- भाजपाचा सत्तेसाठीचा सेंकड हनिमुन पुन्हा नव्याने सुरू झालाय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा ब्रेक-अप होण्याआधी सेना-भाजपाला पुन्हा एकदा नांदा सौख्यभरे याच शुभेच्छा.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv