राजीनामे सध्या खिशातून काढून ठेवलेत - रामदास कदम

राजीनामे सध्या खिशातून काढून ठेवलेत - रामदास कदम

  • Share this:

Ramdas Kadam12131

05 मार्च : निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या  शिवसेनेच्या विरोधाची तलवार म्यान केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी सध्याच्या घडीला आम्ही राजीनामे खिशातून काढून ठेवलं असल्याचं म्हटले आहे. मात्र, नोटीस पिरियडबाबत विचारलं असता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यास आम्ही आमचे राजीनामे केव्हाही देण्यासाठी तयार असल्याचंही कदम यांनी स्पष्ट केलं आहे.

महापालिका निवडणुकीच्या वेळी सत्तेत सहभागी असलेले शिवसेना-भाजप एकमेकांशी यथेच्छ टीका केली होती. दोन्ही पक्षांनी स्वबळावर महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवल्या. त्याचा दोन्ही पक्षांना फायदा होऊन ताकदही वाढली.

मात्र, या दरम्यान, आक्रमक असलेल्या शिवसेना नेत्यांनी आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत असतो. सध्याचे सरकार हे नोटीस पिरीयडवरचं सरकार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता चक्र फिरली असून, शिवसेना नेत्यांनी राजीनामे खिशातून काढल्याची भाषा सुरू केली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत कदम बोलत होते.

तसंच ते पुढे म्हणाले, फक्त मुंबईतच नाहीतर संपूर्ण राज्यात पारदर्शकता हवी. ज्याप्रमाणे मुंबई महापालिकेत उपायुक्त दिला जाणार आहे, त्याचप्रमाणे राज्यातील सर्व प्रमुख महानगरपालिकांमध्ये उपायुक्ताची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी कदम यांनी केली.

दरम्यान, जर उत्तर प्रदेशमधील शेतकऱयांना कर्जमाफी दिली जाते तर महाराष्ट्रात का दिली जात नाही, असा सवालही कदम यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 5, 2017, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading