निवडणुकांतल्या पराभवामुळं विरोधकांमध्ये नैराश्य, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना चिमटे

निवडणुकांतल्या पराभवामुळं विरोधकांमध्ये नैराश्य, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना चिमटे

  • Share this:

Fadnavis

05 मार्च : निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळं विरोधक नैराश्यग्रस्त झालेत, त्यामुळं त्यांना काय मागण्या कराव्यात हे समजत नसल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर गंभीर आहे. पण यूपी आणि महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळं योग्यवेळी योग्य असा निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुंबईमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि इतर मंत्री उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यातील शेतकऱ्यांच्या बाजूने आमचं सरकार आहे, आमचा कर्जमाफीला विरोध नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडून मदत मागणार असून योग्यवेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

त्याचबरोबर, उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहात 27 विधेयके मांडली जाणार आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार आहेत. आत्तापर्यंत 17 लाख क्विंटल तूर हमी भावाने खरेदी करण्यात आली आहे. तसंच शेतकऱ्यांना जलद गतीने कर्ज पुरवठा केला जात आहे. त्यांना वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी या अधिवेशनात प्रयत्न करणार आहे.

यावेळी त्यांनी विरोधकांनीही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, आम्हाला पूर्ण समर्थन मिळाल्याने विरोधकांची घोर निराशा झाली आहे. त्यांना कळत नाही की आता करायचे काय. सध्या विरोधकांकडे मुद्देच नाहीत.

दरम्यान, येत्या 18 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2017 07:56 PM IST

ताज्या बातम्या