भाजप-सेनेला एकमेकांवर केलेल्या आरोपांची आठवण आहे का? - मुंडे

  • Share this:

Dhanajay_vikhe

05 मार्च : महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने एकमेकांवर केलेल्या आरोपांची आठवण करुन देण्यासाठी आम्ही यंदाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री आणि शिवसेनेनेच्या नेत्यांना ‘डू यू रिमेंबर’ असा प्रश्न विचारणार असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

 राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार असून या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी रविवारी पत्रकार परिषद  घेत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते.

निवडणुकीच्या काळात कौरव-पांडव यांची चर्चा होती. मात्र, भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कौरव आहेत, याची प्रचिती आता आली आहे. शिवसेनेने शेतकऱयांच्या कर्जमाफीचे राजकारण केले. त्यामुळे या विविध प्रश्नांवर विरोधक आक्रमक होणार असल्याचंही ते म्हणाले.  

त्याचबरोबर, सैनिकांच्या पत्नींविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच्यावरुन धनंजय मुंडे यांनी सत्ताधारी भाजपवर प्रहार केला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थाच अस्तित्वात नसून भाजपचे आमदार आणि मंत्र्यांना सत्तेची मस्ती चढली आहे अशा बोच-या शब्दात धनंजय मुंडेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

तसंच, भाजप आणि शिवसेनेच्या सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडणार नाही, त्यासाठी आमचं संख्याबळही कमी आहे. त्यामुळे हा ठराव मांडण्याची अनुमती आम्हाला नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 5, 2017, 6:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading