अमेरिकेत पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या व्यक्तीवर हल्ला

  • Share this:

CrimeScene2

05 मार्च :  अमेरिकेत पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या नागरिकावर हल्ला झाला आहे. वॉशिंग्टनमध्ये 39 वर्षीय दीप राय या शीख तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. तुमच्या देशात परत जा अशी धमकी देत शीख तरुणावर हा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर अमेरिकेत राहणा-या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

वॉशिंग्टनमधील कँटमध्ये राहणारा दीप त्याच्या घराबाहेर गाडीचे काम करत होता. यादरम्यान एका अमेरिकन तरुणाने त्याला गाठले. चेहरा झाकलेल्या या हल्लेखोराने शीख तरुणाला तुमच्या देशात परत जा अशी धमक देत त्याच्याशी हुज्जत घातली. यानंतर हल्लेखोराने त्या तरुणावर गोळी झाडली आणि हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेत शीख तरुण जखमी झाला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोराची ओळख अद्याप पटलेली नाही. आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपीचा शोध सुरु आहे अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयावर गोळीबार केल्याची आठवडाभरातील तिसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील कन्सासमध्ये भारतीय तरुणाची वंशभेदातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. तर गुरुवारी रात्री दक्षिण कॅरोलिनामध्ये  हरनिश पटेल या भारतीय वंशाच्या उद्योजकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती.

दरम्यान, शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये शीख व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2017 03:12 PM IST

ताज्या बातम्या