Elec-widget

नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार विराजमान

  • Share this:

Nanda131

  05 मार्च :   भाजपच्या नंदा जिचकार यांना उपराजधानी नागपूरच्या प्रथम नागरिक म्हणजेच महापौरपदी विराजमान होण्याचा मान मिळाला आहे. नागपूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असल्यानं नंदा जिचकार यांनी दणदणीत विजय मिळवला.

नागपूर महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होतं. या निवडणुकीत भाजपसोबतच काँग्रेस आणि बसपनंही उमेदवार उतरवले होते. पण, भाजपच्या सर्वच्या सर्व १०८ नगरसेवकांची मतं मिळवून अपेक्षेप्रमाणे नंदा जिचकार महापौरपदी विराजमान झाल्या.

काँग्रेसच्या स्नेहा निकोसे यांना 26, तर बसपच्या वंदना चांदेकर यांना 10 मतं मिळाली. काँग्रेसचे दोन नगरसेवक उशिरा पोहोचल्यानं त्यांना मतदान करता आलं नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि एक अपक्ष नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहिले.

नंदा जिचकार यांनी प्राध्यापिका म्हणून काम केलं असून नागपूर महापालिकेत त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. भाजपच्या शहर महिला अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्ती म्हणून त्यांना समाजात मान आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2017 03:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...