नाशिकमधल्या मोफत महाआरोग्य शिबिराची गिनीज बुकनंही घेतली दखल

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 5, 2017 02:21 PM IST

नाशिकमधल्या मोफत महाआरोग्य शिबिराची गिनीज बुकनंही घेतली दखल

 

05 मार्च :  कुंभनगरी नाशिकमधे जानेवारीत भरलेल्या आरोग्य महाकुंभानं अनेक विक्रमाची नोंद केली. एकाच दिवसात जवळपास 2 लाख रुग्णांची तपासणी, 2 हजार पेक्षा अधीक तज्ञ डॉक्टरांचा सक्रीय सहभाग आणी सरकारी आरोग्य मदतनिधीसह स्वयंसेवी संस्थानी उभारलेला करोडोंचा निधी. आणि म्हणूनंच गिनीज आणी लिम्का बुकनंही या आरोग्य शिबिराची दखल घेतली. वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून झालेल्या या शिबिरातील 40 हजार रुग्णांच्या शस्त्रक्रियेला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे हृदयापासून ते किडणीपर्यंत होणाऱ्या या सर्व शस्रक्रिया संपूर्ण विनामूल्य होताय.

Nashik shibir

नाशिकच्या या जिल्हा सामान्य रुग्णालयास सध्या जत्रेचं रूप आलंय. आपल्या आर्थिक परीस्थीनं रंजल्या-गांजल्या या खेडोपाडीच्या रुग्णांवर या आरोग्य जत्रेत होताय विनामूल्य शस्रक्रिया.अधू झालेली,गेलेली दृष्टी या रुग्णांची परत आणण्यासाठी आपल्या देशातील प्रख्यात तज्ञ डॉक्टरांची टीम इथे अहोरात्र करतेय ते फक्त ऑपरेशन्स.विशेष म्हणजे उपचारांसाठी लागणारा सर्व खर्च हा सरकार करतंय.

मुंबई शहरात काम करणारे तज्ञ नेत्रासर्जन सध्या या रुग्णालयात ऑपरेशन्स करताय. ऑपरेशन झालेल्या रुग्णांच्या डोळ्यात दिसणारं समाधान,आपल्यासाठीही कोणी आहे हि ते बोलून दाखवत असलेली जाणीव, हे कोणत्याही पैश्यांपेक्षा खूप मोठं असल्याचं हे डॉक्टर बोलताय.

Loading...

असं म्हणतात की कोणत्याही घरात रुग्ण नको कारण त्यासाठी लागणारा खर्च.उपचारासाठी,ऑपरेशनसाठी पैसा नसल्यानं अनेक रुग्णांच्या आपला प्राण गमवावा लागल्याच्या घटना या रोजंच घडत असतात.पण,पैशाअभावी राज्यातील कोणत्याही रुग्णास दुःखी होण्याची आता वेळ येणार नाही.कारण,सरकारनं हा सर्व खर्च करणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे.

गिरीश महाजन यांनी रुग्णसेवेचा घेतलेला हा वसा फक्त शिबिरापुरता मर्यादीत न ठेवता,रुग्णांसाठी घरापासून ते घरापर्यंत राबवलेल्या या आरोग्य जागरात आतापर्यंत राज्यातील 12 लाख रुग्णांची नोंद झाली आहे.अर्थातच,स्वयंसेवी संस्था करीत असलेली मदत नक्कीच उल्लेखनीय.पण यासोबतंच आवश्यकता आहे ती प्रत्येक नागरिकानं आपली जीवनशैली सुधारण्याची आणी जागरूकता हवी ती आरोग्य विमा काढण्याची.सरकारी पातळीवर यासाठीही प्रयत्न झाले तर त्याचा फायदा सर्वसामान्यास होणार हे नक्की. व्हीडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग आयबीएन लोकमत नाशिक.

आरोग्याचा महाजागर

- जानेवारीच्या आरोग्य शिबीरातील 2 लाख रुग्णातील 40 हजार रुग्णांच्या शस्रक्रिया

- मुंबई आणी नाशिकच्या रुग्णालयात सुरु झाल्या शस्रक्रिया

- जे जे हॉस्पिटलची टीम शहरात दाखल

- एकाच दिवसात 462 डोळ्यांच्या शस्रक्रिया

- हृदयापासून ते किडणीपर्यंत होताय शस्रक्रिया

- सर्व खर्च सरकार आणी स्वयंसेवी संस्थांचा

- वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2017 02:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...