करण जोहर झाला जुळ्या मुलांचा बाबा

करण जोहर झाला जुळ्या मुलांचा बाबा

  • Share this:

537899-karan-johar

05 मार्च :  बॉलिवूडचा यशस्वी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. सरोगसीद्वारे करणला एक पुत्र आणि एक कन्यारत्न झालं आहे. या ‘गुड न्यूज’ला करणनं दुजोरा दिला असून त्यानं आपल्या मुलांची नावं 'यश' आणि 'रुही' अशी ठेवली आहेत.

एका मुलाला दत्तक घेऊन किंवा सरोगसी तंत्राचा आधार घेऊन 'सिंगल फादर' बनण्याची इच्छा करण जोहरनं त्याच्या आत्मचरित्रात-'अॅन अनसुटेबल बॉय'मध्ये व्यक्त केली होती. त्यानंतर, गेल्याच महिन्यात ७ फेब्रुवारीला अंधेरीतील मसरानी हॉस्पिटलमध्ये एक महिलेनं जुळ्या मुलांना जन्म दिला.

करणनं एक प्रसिद्धीपत्रक काढून ही गोड बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. वैद्यकीय चमत्कारानं माझ्या आयुष्यात माझ्या काळजाचे दोन तुकडे अवतरले आहेत. आता ही मुलं – रुही आणि यश हेच माझं विश्व आहे आणि त्यासाठी इतर कामं मी कमी करणार आहे, अशा भावना त्यानं व्यक्त केल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2017 11:49 AM IST

ताज्या बातम्या